आर्ट टीचर मुलांना सर्जनशील बनवतात- अनिल बोरनारे  रवींद्र नाट्यमंदिरात आर्ट व्हिजन चे १३ वे राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शन
1 min read

आर्ट टीचर मुलांना सर्जनशील बनवतात- अनिल बोरनारे रवींद्र नाट्यमंदिरात आर्ट व्हिजन चे १३ वे राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शन

Loading

आर्ट टीचर मुलांना सर्जनशील बनवतात- अनिल बोरनारे

रवींद्र नाट्यमंदिरात आर्ट व्हिजन चे १३ वे राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शन

ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) चित्रकलेच्या शिक्षणातून शाळेतील आर्ट टीचर मुलांना सर्जनशील बनवितात असे प्रतिपादन मुंबई मराठी अध्यापक संघांचे अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केले

आर्ट व्हिजन मुंबई यांच्यातर्फे रवींद्र नाट्यमंदिरातील पु. ल. देशपांडे कला दालनात आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या वार्षिक राज्यस्तरीय चित्रकला प्रदर्शनात राज्यस्तरीय गुणिजन कला पुरस्कार तसेच राज्यस्तरीय फलक लेखन पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कलेच्या माध्यमातून मुलांना नवनवीन कल्पना सुचतात विविध रंग आकार रेषा याचा वापर शालेय जीवनातच कला शिक्षक विद्यार्थ्यांना करायला प्रोत्साहन देतात यामुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता वाढीस लागते असेही बोरनारे बोलतांना म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या चित्रकला व शिल्पकला सहाय्यक निरीक्षक आरती धम्मपाल श्रावस्ती,बृहन्मुंबई मनपा कला विभागाचे निदेशक योगेश मोरे, मुंबई कला अध्यापक संघाच्या अध्यक्ष मीरा चाफेकर, पवार पब्लिक स्कूलच्या गौरी परब तसेच आर्ट व्हिजन मुंबईचे कला शिक्षक अर्जुन माचिवले, मनोज सनान्से महेश कदम, रियाज काझी, आनंद मेहर मनोहर बाविस्कर आश्विनी पाटील आदी उपस्थित होते
या चित्रप्रदर्शनात राज्यातील २६ कलाकारांनी आपली कलाकृती प्रदर्शनात मांडली आहे हे प्रदर्शन १० एप्रिल पर्यंत सर्वांसाठी खुले आहे
आर्ट व्हिजन या संस्थेच्या माध्यमातून सलग १३ वर्ष हे प्रदर्शन भरविण्यात येत असून मुंबईतील विविध शाळांमधील कला शिक्षक यामध्ये पुढाकार घेत आहेत
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते २६ सहभागी चित्रकरांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *