अमळनेरमध्ये खड्डयांचे संकट: रस्त्यांची दयनीय स्थिती नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका
![]()
अमळनेरमध्ये खड्डयांचे संकट: रस्त्यांची दयनीय स्थिती नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरात रस्त्यांचे डांबरीकरण सुरू असले तरी, शहरातील अनेक भागांत रस्त्यांची स्थिती अजूनही गंभीर आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या डांबरीकरणानंतरही रस्ते खड्ड्यांनी पोखरले गेले आहेत, ज्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात गोकुळधाम सोसायटीच्या गलवडे रोडवर शौचालयाची टाकी रस्त्याच्या कडेला असल्याने त्या ठिकाणी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे टाकीच्या काठाला तडे गेल्यामुळे घाण पाणी व गटाराचे पाणी रस्त्यावर वाहून येत आहे. खोल खड्डे घाण पाण्याने भरले असून ते सांडण्याचीही शक्यता आहे.
या खड्ड्यांवर कोणाचे लक्ष नसल्याने नागरिकांच्या स्वास्थ्य आणि सुरक्षिततेला गंभीर धक्का बसण्याची शक्यता आहे. गोकुळधाम सोसायटीच्या बांधकाम करणाऱ्या बिल्डरचे, तसेच सध्याचे आणि माजी नगर सेवकांचेही लक्ष याकडे काही नाही.
अपघाताचा धोका वाढलेला असल्याने, नगरपालिका प्रशासनाने रस्त्यांची देखभाल आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे. रमजानच्या पवित्र महिन्यात नमाज अदा करणार्या मुस्लीम समाजाच्या लोकांना या खड्ड्यामुळे अधिक अडचणी येऊ शकतात. खड्ड्यातून वाहन गेल्यास किंवा पाणी लोकांवर पडल्यास वाद वाढण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत, प्रशासनाला तातडीने कार्यवाही करून रस्त्यातील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, ही नागरिकांची मागणी आहे. रस्त्यांची स्थिती सुधारू शकली नाही, तर सार्वजनिक जीवन अधिक धोक्यात येईल, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
शहरातील नागरिकांनी प्रशासनाला एकत्रितपणे गळ घालून या समस्येचे निराकरण करायला सांगितले आहे, जेणेकरून अमळनेर शहराची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत होईल.

