आदरणीय बापुसाहेब मांडे यांचे निधन*
1 min read

आदरणीय बापुसाहेब मांडे यांचे निधन*

Loading

*आदरणीय बापुसाहेब मांडे यांचे निधन*

अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन)

श्री भाऊसो महेंद्र प्रभाकर मांडे ऊर्फ सोनु मांडे यांचे वडील, आदरणीय प्रभाकर मांडे ऊर्फ बापुराव मांडे यांचे आज सकाळी पहाटे ५:३० वाजता वृध्दपकाळामुळे वयाच्या ८३ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
स्वर्गीय बापुसाहेब मांडे यांनी आपल्या कार्यकाळात कृषि क्षेत्रात वनश्री पुरस्कार मिळविला व शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात मोठा ठसा उमटवला. ते एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते, जे मार्गदर्शक म्हणून सर्वांना प्रेरित करत राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकापासून वरच्या पदांपर्यंत त्यांनी अनेक महत्त्वाची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली.
अंगणवाडीपासून प्राथमिक, माध्यमिक, विद्यामंदिर आणि आश्रम शाळा यामध्ये ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेद्वारे त्यांनी पदभार सांभाळला. आपल्या कार्यामुळे त्यांनी सर्व क्षेत्रात नावलौकिक मिळविलं आणि त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाने समाजात आदर्श निर्माण केले.
कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांनी शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनींना सुसंस्कारित करण्याचे कार्य केले. त्यांच्या आठवणी सदैव जागृत राहतील आणि आमच्या सर्वांचा आदरणीय बाबा स्वर्गीय बापुसाहेब मांडे यांच्या स्मृतिला आपण सर्वजण श्रध्दांजली अर्पित करतो.

अंत्यदर्शनासाठी दिनांक १७ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ वाजता मु.पो. हरीपुरा, ता. यावल, जि. जळगाव येथे ठेवण्यात आले आहे. नातेवाईक, मित्र मंडळी आणि समाज बांधवांनी याची नोंद घ्यावी. अंत्यसंस्कार हरीपुरा येथे होणार आहेत.

**भावपूर्ण आदरांजली**
मराठी लाईव्ह न्युज महाराष्ट्र वेबमिडीया टिम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *