रत्नागिरीत जिल्ह्यातील सैतवडे येथे ओपन जिमचा भव्य उद्घाटन सोहळा: सरपंच उषा सावंत यांचे महत्त्वाकांक्षी पहिलं पाऊल!
1 min read

रत्नागिरीत जिल्ह्यातील सैतवडे येथे ओपन जिमचा भव्य उद्घाटन सोहळा: सरपंच उषा सावंत यांचे महत्त्वाकांक्षी पहिलं पाऊल!

Loading

रत्नागिरीतील सैतवडे येथे ओपन जिमचा भव्य उद्घाटन सोहळा: सरपंच उषा सावंत यांचे महत्त्वाकांक्षी पहिलं पाऊल!

रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे (गुम्बद) येथील ग्रामपंचायतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून मंजूर झालेल्या मागासवर्गीय वस्तीसाठी ओपन जिमचा आज भव्य उद्घाटन सोहळा झाला. या उद्घाटनाचे औचित्य साधत सरपंच उषा सावंत यांनी फीत कापली, तर उपसरपंच मुनाफ वागळे यांनी श्रीफळ वाढवून जिमची भव्यतेने सुरूवात केली.
या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य बानु खलपे आणि अनिल आधव यांच्या उपस्थितीत जिमचा वापर स्थानिक नागरिकांसोबतच विद्यार्थी देखील करणार असल्याने समुदायातील आरोग्याची विशेष काळजी घेतली जाईल. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांचे स्वागत करण्यात आले, ज्याचे नेतृत्व मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी केले.
ग्रामपंचायतीने उभारलेल्या या जिमबद्दल दि मॉडेल इंग्लिश स्कुलच्या व मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे पार्श्वभूमीवर श्रीमती सुवर्णा देशमुख, श्रीमती ऋतुजा जाधव, अविनाश केदारी, पोवार सर, रुमान पारेख, सोनाली निवेंडकर, सागर पवार, नौशाद मुल्ला, राजेंद्र कदम यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
हा उद्घाटन सोहळा स्थलिय समुदायासाठी आरोग्य व फिटनेशनच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *