विद्यापीठस्तरीय तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात सागर कोळी यांचा बोलीभाषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक**
![]()
**विद्यापीठस्तरीय तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनात सागर कोळी यांचा बोलीभाषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक**
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सोमवार, १० मार्च २०२५ रोजी कबचौउमवि संचलित प्रताप तत्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे विद्यापीठस्तरीय तिसरे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेरचा विद्यार्थी सागर सुकदेव कोळी याने बोलीभाषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाच्या प्रत्यक्षवेळी सागरला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या समारोप व बक्षीस वितरण प्रसंगी कबचौउमवि चे व्यवस्थापन परिषद सदस्य व कार्याध्यक्ष अँड. अमोल पाटील, प्रताप तत्वज्ञान केंद्राचे सल्लागार समिती सदस्य दिनेश नाईक, मानद संचालक प्रा. डॉ. एस.डी. ओस्तवाल, व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन झाल्टे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, तसेच जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. संजय पाटील उपस्थित होते.
सागरच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे चेअरमन अभिजीत भांडारकर, प्राचार्य डॉ. पी.एस. पाटील, प्रा. डॉ. अस्मिता सरवैया, प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. डॉ. डी आर ढगे, प्रा. डॉ. Anita खेडकर, प्रा. डॉ. श्वेता वैद्य, प्रा. डॉ. सागरराज चव्हाण आणि प्रा. डॉ. भारत खंडागळे यांनी सागरचे हार्दिक अभिनंदन केले.
यशाच्या या क्षणी सागरने आपल्या मेहनतीचा आणि समर्पणाचा विजय साधला आहे, ज्यामुळे तो आपल्या महाविद्यालयासाठी एक आदर्श ठरला आहे. त्याच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि साहित्य क्षेत्रात नवीन उच्चांक गाठण्याची प्रेरणा मिळेल, ही अपेक्षा!

