बस चालकांनी वर्षभर विना अपघात बसेस चालवण्याचा संकल्प करा-प्राचार्य बी.एम भामरे.*
![]()
बस चालकांनी वर्षभर विना अपघात बसेस चालवण्याचा संकल्प करा-प्राचार्य बी.एम भामरे.
*साक्री*—-बस चालकांनी विना मानसिक तणावात, विना मद्यपान स्थितीत, मोबाईलचा वापर टाळत व वाहतुक नियमांचे पालन करत वाहने चालविली तर एकही अपघात होणार नाही याची खात्री बाळगत, येत्या वर्षभरात साक्री आगारास विना अपघाताचा सन्मान मिळवण्याचा संकल्प करा असे आवाहन प्राचार्य बी.एम भामरे यांनी केले.
राज्य परिवहन मंडळाच्या साक्री आगारात आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मासिकाच्या उद्घाटन समारंभा प्रसंगी मार्गदर्शन करतांना प्रवासी महासंघाचे सचिव प्राचार्य बी.एम भामरे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साक्री आगाराचे व्यवस्थापक सुनील महाले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साक्री पोलीस ठाण्याचे सह.पो.नि.शेवाळे , साक्री तालुका प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सुरेश भाऊ पारख,धुळ्याचे सहा.उपयंत्र अधिक्षक अहिरराव, सहा.वहातुक अधिक्षक घडमोडे , लिपीक राजेंद्र पाटील, लेखाकार साबळे आदि उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात ए.पी.आय.शेवाळे म्हणाले की,रस्ता वाहतुक सुरक्षा हा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग असुन यासाठी वाहन चालकांबरोबर तांत्रिक कर्मचा-यांनी देखिल आपल्या बसेस निर्दोष ठेवल्या तर अपघात टाळुन प्रवास्यांना आपण सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी असे वाहन चालक व तांत्रिक कामगारांना आवाहन करत शुभेच्छा दिल्यात.
या प्रसंगी सुरेश भाऊ पारख म्हणाले की,राज्य परिवहन मंडळाचे “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे जे ब्रीद आहे त्यास एकनिष्ठ राहून आपण आपल्या बसमधे प्रवास करणारे जेवढे प्रवासी असतात ते केवळ तेवढे प्रवासी प्रवास करत नसतात तर, तेवढे कुटुंब प्रवास करत असतात याचे गांभीर्य ओळखून आपण किती जणांच्या सुरक्षेस जबाबदार असतो हे आपण ध्यानी घेवुन वाहन चालवावेत व आम्हास विना अपघात चालकांचा सन्मान करण्याची संधी द्यावी असे आवाहन करत शुभेच्छा दिल्यात.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात आगार व्यवस्थापक सुनील महाले म्हणाले की, आपल्या वाहन चालकांच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून होणारे कोणत्याही प्रकारचे अपघात आगाराला अजिबात परवडत नाहीत, ज्यामुळे जाणारे जीव तर परत येतच नाहीत, पण त्यांच्या नुकसानीचीही महा मंडळाला मोठी आर्थिक झळ सोसावी लागते , ज्यामुळे आपले मोठे नुकसान होते याचा गांभीर्याने विचार करावा व विना अपघात चालकांच्या महामंडळाच्या विविध पुरस्कारांचे मानकरी होण्याचे आवाहन केले.
उपयंत्र अधिक्षक अहिरराव यांनीही मनोगत व्यक्त केलेल्या या कार्यक्रमास वाहक, चालक व तांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थितीत होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक राहुल साळुंखे यांनी तर यशस्वीतेसाठी के.टी.पाटील,एन के मोरे,संदिप खैरनार,योगेश मोहिते,सुरेश बुवा,देशपांडे, सामुद्रिक, व ठाकरेंनी सहकार्य केले.

