भगीरथ च्या दिपाली इंगळे हिस खान्देश स्तरीय तृतीय पुरस्कार
![]()
भगीरथ च्या दिपाली इंगळे हिस खान्देश स्तरीय तृतीय पुरस्कार
अमळनेर प्रतिनिधी
राष्ट्र सेवा दल आणि अन्नपूर्णा परिवार , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि प. पू. साने गुरुजी यांच्या १२५ व्या शतकोत्तर रजत जयंती निमित्ताने
‘साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प’ स्पर्धेत कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल जळगाव या शाळेची कु. दिपाली गोरख इंगळे , इयत्ता ९ वी हिचा खान्देश स्तरीय तृतीय क्रमांक आला. तिला आकर्षक स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक आणि रोख रक्कम दोन हजार रुपये चे बक्षिस देऊन पुणे येथे प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते दिपालीचा, पालकांचा व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच शाळेतील कु. चांदणी सूर्यवंशी , कु.मयुरी कोळी, कु.मानसी बडगुजर , चि. पियुष मगरे यांनाही सहभाग सन्मानपत्र मिळाले. आणि मार्गदर्शक शिक्षक अशोक पारधे सर यांनाही विशेष सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना
अशोक पारधे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.बक्षिस पात्र विद्यार्थी व शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद चांदसरकर,
मुख्याध्यापक एस्.पी.निकम सर,जेष्ठ शिक्षक एस डी भिरूड सर, यांनी अभिनंदन केले.

