आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे हिवाळी अधिवेशन जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या उपस्थितीत संपन्न*
1 min read

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे हिवाळी अधिवेशन जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या उपस्थितीत संपन्न*

Loading

*आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे हिवाळी अधिवेशन जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या उपस्थितीत संपन्न*

सविस्तर वृत्त –

आज गुरुवार, दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी, जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे दरवर्षी प्रमाणे चालू वर्षे २०२४ चे हिवाळी अधिवेशन राळेगणसिद्धी, ता.पारनेर, जि.अहमदनगर या ठिकाणी जेष्ठ समाजसेवक पद्मश्री पद्मभूषण डॉ.अण्णासाहेबजी हजारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
या अधिवेशनासाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. देवा तांबे तसेच संस्थेच्या इंडोनेशिया देशाच्या महिला अध्यक्षा मनिषा भुसाळ यांची विशेष उपस्थिती होती. तसेच संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला सचिव सौ.अर्चना जगताप,महिला निरीक्षक सौ.स्नेहा तांबे,पुणे शहर महिला अध्यक्षा सौ.लीना पंडित,संस्थेचे महाराष्ट्र राज्य युवा महासचिव विजय पडळकर,युवा निरीक्षक राजेश कुस्पे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

 

या अधिवेशन सोहळ्यात कार्याचा गौरव म्हणून सेवानिवृत्त सैनिक कविवर्य अशोक मोहिते यांना राष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्कार २०२४ , निवृत्त अधिक्षक अभियंता रमेशचंद्र म्हैसेकर यांना राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार,मनिषा भुसाळ यांना राष्ट्रीय हिरकणी पुरस्कार, महिला उद्योजिका सौ.रेशमा जाधव यांना राष्ट्रीय महिला उद्योजिका पुरस्कार, आध्यत्मिक मार्गदर्शिका अर्चना जगताप यांना तसेच लीना पंडित गोडबोले यांना राष्ट्रीय आध्यत्मिक मार्गदर्शक पुरस्कार २०२४ या इत्यादी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *