अमळनेर मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठीआणि शेतकरी, कष्टकरी आत्मसन्मानासाठी मतदान करण्याचे शिरीष चौधरींचे भावनिक आवाहन
![]()
अमळनेर मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठीआणि शेतकरी, कष्टकरी आत्मसन्मानासाठी मतदान करण्याचे शिरीष चौधरींचे भावनिक आवाहन
अमळनेर :
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण मायबाप जनतेने माझ्यावर अर्थात खऱ्या भूमिपुत्रावर दाखविलेला विश्वास आणि आशीर्वादाने माझे मन अगदी गहिवरून गेले आहे. आपण हे प्रेम, हा विश्वास दाखविल्यामुळेच आपल्याला मतदारसंघाचा शाश्वत विकास करून दाखवायचा आहे. त्यासाठी मतदार राजांनो बॅलेट मशीनवरील क्रमांक ११ वरील ‘बॅट’ या चिन्हावर मतदान करणे आवश्यक आहे. कारण गेल्या पाच वर्षात आपला शेतकरी उघड्यावर पडला आहे, कष्टकरी भुकेला आहे, युवक बेरोजगार झाला आहे, महिला अबला झाल्या आहेत. या सर्वांना न्याय देण्यासाठी आपल्यातला माणूस, आपला हक्काचा माणूस, भूमित जन्म घेतलेला खरा भूमीपुत्र ला साथ दया, आणि आपलें अनमोल मतं मला दया असे भावनिक आवाहन माजी आमदार शिरीष चौधरींनी केले आहे.
शिरीष चौधरी यांनी विनंती वजा भावनिक आवाहन केले कि, माझी लढाई ही तुमच्या न्याय हक्कासाठी, तुमच्या आत्मासन्मानासाठी आहे, मी तुमच्यासाठी लढतो आहे.
अनिल पाटील हे मदत व पुनर्वसन मंत्री असूनही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही, गेल्या पाच वर्षात कष्टकरी शेतकऱ्यांचे जे हाल झालेत, ते माझाकडून बघविले गेले नाहीत, त्यामुळे आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी, मीच खरा भूमिपुत्र असल्याने, शेतकरी बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी, या मातीचे ऋण फेडण्यासाठी मला पुन्हा यावे लागले.
या मंत्र्याने पीक विमा असेल, ओला दुष्काळ असेल याबाबतीत शेतकऱ्यांना न्याय न देता स्वतः अमाप पैसा कमावून घेतला आणि तोच पैसा आता निवडणुकीत वापरतो आहे. तरीही मला विश्वास आहे कि, माझी भोळीभापळी जनता पुन्हा या मंत्र्याच्या जाळ्यात येणार नाही आणि पुन्हा स्वतःची फसवणूक करून घेणार नाही. मी मायबाप जनतेला आवाहन करतो कि, हि लढाई माझी नसून मी तुमच्यासाठी लढतो आहे, त्ही लढाई तुमच्या हक्क मिळविण्यासाठी यामुळे मला आपल्या मतदानरूपी आशीर्वादाची गरज असून आपण माझ्या झोळीत मतदान टाकाल व पुन्हा मला आपल्या सेवेची संधी द्याल, त्यासाठी आपला किमती वेळ काढून ‘बॅट’ या चिन्हावर जास्तीतजास्त मतदान कराल असे आवाहन शिरीष चौधरी यांनी केले आहे.

