विभागीय तलवारबाजी स्पर्धेत श्री वाणी विद्यालयाचे घवघवीत यश.* कल्याण डोंबिवली क्रीडा विभागची राज्यस्तरीय विजयी पताका *तलवारबाजी स्पर्धेत विजयाचे खरे श्रेय क्रीडा संघटक गजानन वाघ यांचेआहे :एस.सुब्रमण्यम
![]()
*विभागीय तलवारबाजी स्पर्धेत श्री वाणी विद्यालयाचे घवघवीत यश.*
कल्याण डोंबिवली क्रीडा विभागची राज्यस्तरीय विजयी पताका
*तलवारबाजी स्पर्धेत विजयाचे खरे श्रेय क्रीडा संघटक गजानन वाघ यांचेआहे
:एस.सुब्रमण्यम
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)विभागीय तलवारबाजी स्पर्धेचा निकाल
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे खालील खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले
१७ वर्षांखालील मुले गटात
१)जय शांतीलाल चव्हाण (१० वी) – सेबर प्रकार – प्रथम क्रमांक – (श्री वाणी विद्याशाला हायस्कूल खडकपाडा)
२) कार्तिक विजय सिंग -(११ वी) फॉइल व ईपी – तृतीय क्रमांक (के.एम. अग्रवाल कॉलेज, कल्याण १९ वर्षांखालील मुले गटात
१) विश्वराज दत्तात्रय गिरी (११ वी) ईपी व फॉइल प्रकार – प्रथम क्रमांक – नारायणा ज्यूनियर कॉलेज, कल्याण
२) निखिलेश मंजूनाथ शेट्टी -(११ वी)- द्वितीय क्रमांक – सेबर प्रकार -नारायणा ज्यूनियर कॉलेज
३) मयंक प्रताप पगार (१२ वी) तृतीय क्रमांक – इपी प्रकार – के. एम. अग्रवाल कॉलेज कल्याण
१७ वर्षांखालील मुलींचा गटात
१) प्राची योगेश गायकर (९ वी)- तृतीय (डॉन बॉस्को कल्याण)
१९ वर्षांखालील मुली
१) यशोधरा डोरनल- प्रथम क्रमांक – इपी प्रकार – साऊथ इंडियन कॉलेज डोंबिवली
२) श्रेया मौर्या (१२ वी) – द्वितीय क्रमांक – सेबर प्रकार – साऊथ इंडियन कॉलेज डोंबिवली
वरील सर्व खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्या देण्यात आल्या आहेत.
मुंबई तलवारबाजी संघटनेचे पदाधिकारी कल्याण डोंबिवली क्रीडा तक्रार निवारण समितीचे सदस्य व उत्कृष्ठ क्रीडा संघटक श्री गजानन वाघ, मुंबई उपनगर तलवारबाजी संघटनेचे सचिव श्री केदार ढवळे,
पालघर तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. भाटकर, विभागीय तलवारबाजी स्पर्धा प्रमुख श्री मिलिंद ठाकूर,श्री आनंद वाघमारे सदस्य मुंबई तलवारबाजी संघटना, श्री महेश वाघ- श्री वाणी विद्याशाला हायस्कूल श्री महेश वाघ,
या सर्व मान्यवरांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले.श्री गजानन वाघ,श्री. मंगेश भोइटे व श्री
विशाल शिंदे कोच श्री वाणी विद्याशाला हायस्कूल
मुख्याध्यापिका सौ अंजना रेड्डी, एस आय ए स्पोर्ट्स अकॅडमीचे चेअरमन श्री एस.सुब्रमण्यम यांच्याकडून विजयी खेळाडूंचे अभिनंदन आणि गौरव करण्यात आला.

