अमळनेर येथे बळीराजाचे पूजन करत शेतकरी ,कष्टकरी बांधवांच्या समस्यांवर झाली चर्चा
![]()
अमळनेर येथे बळीराजाचे पूजन करत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर झाली चर्चा
अमळनेर प्रतिनिधी:
दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी, अमळनेर येथील कार्यक्रमात विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराजाच्या पूजनानंतर विचार पिठावर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे, मुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष श्याम पाटील तसेच प्रा. डॉ. लिलाधर पाटील, शेतकरी दिनेश पाटील व सौ पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बळीराजाचे पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी दांपत्य दिनेश पाटील व सौ पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी भाषणात सामाजिक न्यायाचा मुद्दा उठविला. ते म्हणाले, “इडा पिडा टळो आणि बळीच राज्य येऊ” असं स्पष्ट करताना त्यांनी महिलांच्या प्रार्थनांना महत्त्व दिले. त्यांनी उत्तर दक्षिण भारतातील ओनम सणावर चर्चा केली ज्यामध्ये बळीराजाचा संदर्भ घेत ‘बळीराजाचा’ आदर्श राज्य प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं.

महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार
डॉ अनिल शिंदे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संकटांवर भाष्य करीत, “शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे,” असे म्हटले. त्यांनी सरकारवर आरोप करत, धरण पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार कसे कार्य करू शकते, परंतु राज्य सरकार मात्र त्यामुळे अयशस्वी ठरले आहे, असे सांगितले. आतापर्यत तिन्ही दादांना आपण संधी दिली यावेळेस मला संधी द्या असे त्यांनी आवाहन केले

शरदचंद्रजी पवार गटाचे श्याम पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील विरोधकांबद्दल चिंता व्यक्त करत, “शेतकऱ्यांचे मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि मी त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहीन,” असे म्हटले.. या अगोदरही शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलन केली आहेत व भविष्यातही करत राहणार असे सांगत
त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयाराम पाटील सर यांनी केले. या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे आभार श्याम पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुद्रा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी प्रयत्न केले..


