“जादुई क्षण: दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला विशेष वाढदिवस आणि दिला अनमोल अनुभव!”
1 min read

“जादुई क्षण: दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला विशेष वाढदिवस आणि दिला अनमोल अनुभव!”

Loading

“जादुई क्षण: दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला विशेष वाढदिवस आणि दिला अनमोल अनुभव!”

अमळनेर प्रतिनिधी
आज दि.11/10/2024 वार शुक्रवार रोजी आमच्या चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुलामुलींची निवासी शाळा येथे मा. किशोर चव्हाण मुख्याधिकारी पारोळा नगरपरिषद यांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस आमच्या विशेष विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. तसेच रू.5000/- किराणासाठी भेट म्हणून दिले.यावेळी वैशाली पाटील व संगीता महाजन यांनी स्वागतगीत म्हटले,तर शाळेतील विशेष विद्यार्थी प्रधान याने इतनी शक्ती हे गीत म्हणून दाखविले,तर अजय परदेशी याने सिने कलावंत यांची नक्कल करून दाखविली.डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर अध्यक्ष परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार करण्यात आला.समवेत श्री विशाल चव्हाण साहेब (बांधकाम अभियंता न.पा पारोळा), यांचा सत्कार शाळेचे उपमुख्याध्यापक श्री हेमंत महाजन सर यांनी केला.चव्हाण साहेब यांनी मनोगतात डॉ योगेश रघुनाथ महाजन यांचे व सर्व कर्मचारी यांचे कौतुक केले.तसेच मा. किशोर चव्हाण साहेब यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्न बालरंगभूमी नाट्य परिषद जळगाव दिव्यांग महोत्सवात “विशेष शाळा ही काळाची गरज ‘सादर करण्यात आलेले नाटकांमध्ये सहभागी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन प्रताप पाटील सर यांनी केले तर आभार हेमंत महाजन सर यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *