एमपीएससी तर्फे 1813 पदांसाठी महाभरती. पोलीस उपनिरीक्षक ,राज्यकर निरीक्षक इत्यादी पदांसाठी परीक्षा जळगाव येथे 13 पासून विनामूल्य मार्गदर्शन
![]()
एमपीएससी तर्फे 1813 पदांसाठी महाभरती.
पोलीस उपनिरीक्षक ,राज्यकर निरीक्षक इत्यादी पदांसाठी परीक्षा
जळगाव येथे 13 पासून विनामूल्य मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या विविध पदांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेले आहेत. या अंतर्गत संयुक्त गट ब अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी 480 पदे जाहीर झालेली असून या पदांसाठी 2025 मध्ये पाच जानेवारी रोजी पूर्व परीक्षा संपन्न होणार आहे. तसेच संयुक्त गट क अंतर्गत कर सहाय्यक ,उद्योग निरीक्षक तसेच लिपिक व टंकलेखक पदासाठी तब्बल 1311 जागा जाहीर झालेल्या आहेत. या पदांसाठी पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर संपन्न होणार आहे.दोन्ही परीक्षांसाठी परीक्षेच्या अर्जाची अंतिम मुदत 14 नोव्हेंबर असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज भरायला प्रारंभ झालेला आहे.
यासाठी जळगाव,धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.जळगाव येथील नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे दिनांक 13 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2024 विनामूल्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदर महाशिबिर नोबेल फाउंडेशन, प्रगती विद्या मंदिर समोर या ठिकाणी सकाळी 10 ते 01 या वेळात संपन्न होणार आहे.
या अंतर्गत दिनांक 13 ऑक्टोबर रोजी राज्यातील सुप्रसिद्ध लेखक वित्त व लेखा अधिकारी कपिल पवार भूगोल विषयाचे तर दिनांक 14 ऑक्टोबर रोजी विज्ञान विषयाचे प्रसिद्ध लेखक जयदीप पाटील आणि 15 ऑक्टोबर रोजी बुद्धिमापन चाचणी तज्ञ मिलिंद पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र तर्फे करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी 9922004193 या क्रमांकावर संपर्क साधावा

