आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून चाचपणी
![]()
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. या अनुषंगाने जळगाव जिल्हा काँग्रेस कमीटीच्या वतीने आमदार के.सी.पाडवी यांनी काँग्रेसच्या डॉक्टर अनिल नथ्थु शिंदे व अन्य इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून चाचपणी केली. यावर गेल्या निवडणूकीत काँग्रेसला १ जागा सोडली होती, यावेळी काँग्रेसला किमान ४ ते ५ जागा मिळावी असा आमचा प्रयत्न असून विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला यश मिळणार असल्याची प्रतिक्रीया जेष्ठ नेते आमदार के.सी. पाडवी यांनी दिली. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील आदी उपस्थित होते.

चौकट
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ अनिल शिंदे,काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, काँग्रेसचे संदीप घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष के.डी.पाटील,माजी जिल्हा परिषदेचे सदस्य शांताराम बापू पाटील, सामाजिक कार्यकर्त्या संगिता पाटील,प्रा सुभाष पाटील,, सह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी वरील उमेदवारांनी वरिष्ठ पातळीवर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून वरिष्ठ पदाधिकारी काँग्रेस पक्षासाठी जागा सोडण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.. कुणाला उमेदवारी मिळते व जागा कोणत्या पक्षाला मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे..



