कल्याण येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न.
![]()
कल्याण येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न.
कल्याण मध्ये सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करून खेळाडूंना सुविधा उपलब्ध करून देईल: आमदार विश्वनाथ भोईर.
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)
कल्याण येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय कुस्ती स्पर्धा 2024, रिटा मेमोरीयल स्कूल, वायले नगर खडक पाडा, कल्याण येथे खेळीमेळीच्या वातावरणात आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेचे उदघाटन प्रवीण कांबळे सर (क्रीडा पर्यवेक्षक) कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आदरणीय विश्वनाथ दादा भोईर, सन्माननीय नगरसेवक जयवंत दादा भोईर, सन्माननीय नगरसेवक श्री. सुनिल वायले, छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते पैलवान चैनु दादा लोखंडे,रिटा मेमोरीयल स्कूलचे ट्रस्टी पॉल सर, सोबत तसेच रिटा मेमोरियल शाळेच्या सुपरवायझर,रेणुका पिसे, क्रीडा अधिकारी प्रविण कांबळे यांचे उपस्थितीत कल्याण पश्चिम चे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री विश्वनाथदादा भोईर व नगरसेवक श्री.जयवंत भोईर यांचे शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.*
या स्पर्धेसाठी 14 वर्षे वयोगट मुले,मुली,
17 वर्षे वयोगट मुले, मुली,
19 वर्षे वयोगट मुले मुली,
*17 वर्ष वयोगट ग्रीको रोमन,*
19 वर्ष वयोगट ग्रीको रोमन, या गटांमध्ये एकूण 275 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
त्याचबरोबर मंचावर कल्याण डोंबिवली महानगर पालिका कुस्तीगीर संघांचे अध्यक्ष पंढरी ढोणे, सुरेश पाटील (खजिनदार, महाराष्ट्र राज्य कुस्तगीर परिषद) जगन पाटील सरपंच इताडे सुजित (तात्या) पाटील उद्योगपती काल्हेर, मौलिक सर, मॉडेल कॉलेज, चिंतामण पाटील, सुभाष ढोणे, सतीश घोडे, जितेंद्र पाटील, विनोद पाटील, जगदीश भगत, गणेश पाटील, नरेश पाटील (उद्योगपती) सापाड, खंडू चिंचपाडकर, दुर्योधन भगत, गजानन घोडे, मोहन मढवी, लखन म्हात्रे, दयानंद घोडे, दिनेश थळे मुथा कॉलेज क्रीडा शिक्षक, रघुनाथ पाटील वस्ताद सर्व शाळांचे क्रीडा शिक्षक व पालक उपस्थित होते. सर्व कुस्तीस्पर्धा पंच यांनी अत्यंत उत्कृष्ट रित्या कामगिरी पार पाडली.
संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री सतिश म्हात्रे यांनी केले.
कुस्ती स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी जय हनुमान तालीम संघ सापाडचे वस्ताद मंडळी व पैलवान यांनी विशेष मेहनत घेतली.
खेळ प्रमुख म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कुस्ती स्पर्धा 2024.
स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी NIS क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक मॉडेल कॉलेज,डोंबिवलीचे प्रा.सुभाष पंजे, व शेठ हिराचंद मुथा कॉलेज चे फिजीकल डायरेक्टर दिनेश थळे,मॉडेल कॉलेज चे क्रीडा संघटक प्रा.सुभाष गायकवाड, क्रीडा व तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष अंकुर आहेर, मुख्याध्यापक ,ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक महादेव क्षिरसागर, प्रविण खाडे,उगलमुगले सर, न्यू हायस्कूल चे उमेश परब सर,यांनी विशेष सहकार्य केले.

