संविधानिक मूल्यांना प्रस्थापित व्यवस्थेपासून अत्यंतिक धोका- मुकुंद सपकाळे
![]()
संविधानिक मूल्यांना प्रस्थापित व्यवस्थेपासून अत्यंतिक धोका-
मुकुंद सपकाळे
भारतीय संविधानाच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांना अधिकाधिक समाजमनात रुजूवात करण्यासाठी पुरोगामी चळवळीची दिशा ठरलेली असतानाच प्रस्थापित व्यवस्था या संविधानिक मूल्यांना धोका पोहोचत असल्याचे मत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा आरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी उपवर्गीकरण संदर्भात तसेच जेष्ठ विचारवंत श्याम मानव यांच्या व्याख्यानासंदर्भात आयोजित बैठकी प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. बैठकीचे प्रास्ताविक विनोद सपकाळे यांनी तर कार्यक्रमांची भूमिका जयसिंग वाघ यांनी विषद केली.रवींद्र तायडे,

डॉ. मिलिंद बागुल प्रा. डॉ. सत्यजित साळवे, दिलीप अहिरे, राजेंद्र सूर्यवंशी, महेश शिंपी, एडवोकेट राजेश गोयल, श्रीकांत बाविस्कर, सरोजिनी लभाने सुभाष सपकाळे, जगदीश सपकाळे, दिलीप सपकाळे, खुशाल चव्हाण, भरत सोनवणे यांनी याप्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली. प्रा. डॉ. संजीव साळवे श्रीकांत बाविस्कर आधार सपकाळे, दिलीप सपकाळे, बापू साळुंखे, चंद्रकांत नन्नवरे, फुलकेशि केदार, समाधान सोनवणे, राजीव भाऊ सोनवणे यांनी चर्चेत सहभाग घेतला

सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी तर जगदीश सपकाळे यांनी आभार मानले बैठकीस सतीश गायकवाड, अजय बिऱ्हाडे सोमा भालेराव, महेंद्र केदारे भैय्या सपकाळे अनेक मान्यवर उपस्थित होते.

