जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सार्वजनिक विद्यालय असोदा विजयी
1 min read

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सार्वजनिक विद्यालय असोदा विजयी

Loading

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सार्वजनिक विद्यालय असोदा विजयी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आयोजित 17 वर्षीय मुलांच्या कबड्डी स्पर्धेत सार्वजनिक विद्यालय असोदा हा संघ विजयी ठरला. स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 15 तालुक्यातील प्रत्येकी एक विजयी संघ सहभागी झालेला होता त्यामध्ये असोदा ,तालुका जळगाव संघाने बोदवड, पारोळा, रावेर या तालुक्यांच्या संघांना नमवत पाचोरा तालुक्याशी झालेल्या अंतिम सामन्यात विद्यालयाच्या जुनेद खाटिक ,रोशन पाटील ,साहिल पिंजारी , ज्ञानेश्वर कोळी, धीरज कोळी, नितीन कुंभार, मयूर कुंभार, सुमित महाजन इत्यादी खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळामुळे विजय खेचून आणला. विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ मिलिंद बागुल, पर्यवेक्षक एल. जे. पाटील यांनी व इतर शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रशांत कोल्हे, डी.जी. महाजन, जितेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *