Computer Application – AI Technology चा उपयोग व कार्य महत्त्वाचे- प्रा.राकेश रामटेके यांचे प्रतिपादन
![]()
Computer Application – AI Technology चा उपयोग व कार्य महत्त्वाचे- प्रा.राकेश रामटेके यांचे प्रतिपादन
———————————————–
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित बीसीए विभाग, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त),अमळनेर आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान ( रूसा ) यांच्या संयुक्त विद्यामाने UNLOCKING INSIGHT : The convergence of PR , AI , ML & data Visualization या विषयावर दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी व्याख्यान आयोजित केले होते . प्रस्तुत व्याख्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठ, जळगाव येथील संगणक शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.राकेश रामटेके हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
यावेळी प्रा.रोहन गायकवाड यांनी कार्यक्रमाची प्रस्ताविक केले. प्रा. डॉ. राकेश रामटेके यांनी त्यांच्या व्याख्यानात मानवी मेंदू आणि संगणक यांच्यातील समानता आणि फरक यावर देखील विस्तृत विवेचन केले. त्यांनी सांगितले की, New Fluorescent Technology, Artificial Wisdom and Machine Learning हे तंत्रज्ञान मानवाच्या बुद्धिमत्तेशी सुसंगत आहे आणि संगणकांना मानवासारखे विचार करण्यास सक्षम बनवण्याचा प्रयत्न आहे. मानवी मेंदू जसा विविध अनुभव आणि भावना समजून घेतो, तसेच संगणक देखील विविध तंत्रज्ञानाद्वारे माहितीचे विश्लेषण करून त्याचा सुगंध, चव, आवाज यांसारख्या गोष्टींशी संबंध जोडू शकतो. त्यांनी मानवी बुद्धिमत्तेतील सहजता आणि संगणकाच्या अचूकतेचे महत्व सांगत दोन्हींचे योग्य मिश्रण कसे भविष्यातील तंत्रज्ञानात क्रांती घडवू शकते, यावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.डॉ.राकेश रामटेके यांनी Computer Application च्या विद्यार्थ्यांना सांगितले की, AI Technology चा फक्त वापर करण्या ऐवजी त्यांला समजून घ्या,असे आव्हान केले.
सदरच्या कार्यक्रमासाठी Computer Application विभागाचे जवळपास 160 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. अमित पाटिल यांनी भूषविले तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. एस बी बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.निकिता राऊळ यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ . विजय तुंटे व प्रा. ज्ञानेश्वर कांबळे उपस्थित होते.
प्रा.भराटे सरांचे सहकार्य लाभले याचप्रमाणे बीसीए विभागाच्या प्रा.भाग्यश्री सपकाळे , प्रा.नेहा पवार , प्रा.सविता सावंत , प्रा. हिमानी पाटील , प्रा.प्रतिक्षा शर्मा , श्री दिनेश ठाकुर यांचे सुद्धा विशेष सहकार्य लाभले .

