सूक्ष्मजीवशास्त्र विभागात “पॅथॉलॉजी, मेडिकल डायग्नोसिस व क्लिनिकल ट्रायल्स या क्षेत्रात करियर च्या संधी
1 min read

सूक्ष्मजीवशास्त्र विभागात “पॅथॉलॉजी, मेडिकल डायग्नोसिस व क्लिनिकल ट्रायल्स या क्षेत्रात करियर च्या संधी

Loading

सूक्ष्मजीवशास्त्र विभागात “पॅथॉलॉजी, मेडिकल डायग्नोसिस व क्लिनिकल ट्रायल्स या क्षेत्रात करियर च्या संधी-
————————————————-
या विषयावर डॉ.अरुण पी पाटील यांचे व्याख्यान संपन्न.
———————————————–
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(रुसा)यांच्या संयुक्त विद्यमाने श्री बॅक्टेरियोलॉजी लॅबोरेटरी जळगावचे संचालक डॉ.अरुण पी पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सूक्षजीवशास्त्र विषयात पदवी प्राप्त केल्यावर अनेकविध क्षेत्रात नोकरीच्या संधी कशा उपलब्ध आहेत, याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण बी.जैन सर यांनी अतिथींचे स्वागत केले. प्रस्तुत समारंभाचे सूत्रसंचालन कु.जान्हवी जोशी या विद्यार्थिनीने केले.विभागप्रमुख प्रा.शशिकांत जोशी यांनी प्रास्तविक सादर केले. पाहुण्यांचा परिचय एम .एस्सी च्या कु.धन्वंतरी पवार या विद्यार्थिनींने करून दिले.

डॉ.अरुण पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात औषधे निर्माण करणाऱ्या कंपनीत, फूड कंपनी व डेअरीत, आरोग्य सेवेत ,केमिकल तयार करणाऱ्या कंपनीत, पॅथॉलॉजी मधे,नवनवीन तयार होणाऱ्या औषधांची पेशंट वर चाचणी घेणाऱ्या हॉस्पिटल्स मधे ,संशोधन क्षेत्र अशा विविध क्षेत्रात सूक्ष्मजीवशास्त्रात पदवीधर विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध आहेत, याबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली. यामुळे पदवी साठी आपण निवडलेल्या विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.तन्वी महाजन या विद्यार्थिनीने केले.
याप्रसंगी विभागातील प्रा.वैशाली महाजन,प्रा.हेमलता सूर्यवंशी, प्रा.स्नेहल सूर्यवंशी,प्रा.दिशा पाटील प्रा.नूतन बडगुजर, प्रा.तेजस्वनी पाटील प्रा.आदित्य संकलेचा,प्रा.नेहा महाजन,प्रा.तेजस्विनी पाटील ,प्रा.केतकी सोनवणे,प्रा.भावना महाजन,प्रा.कल्याणी पाटील,प्रा.नेहा पाटील व सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.यासाठी प्रयोगशाळा परिचर श्री विलास पाटील व किशोर सोनार यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *