मारवड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा
![]()
मारवड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा
कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश आणि कार्य या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्हि. डी. पाटील यांनी भुषविले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिलीप कदम उपस्थित होते. सुरुवातीला आलेल्या पाहुण्यांचा व माजी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसायविषयी प्रा.डॉ. दिलीप कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिला. खेड्याने अजूनही संस्कार जोपासली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी ग्राम स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करावा असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.व्हि.डी. पाटील यांनी देशाच्या विकासात राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले. महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.नंदा कंधारे यांनी विद्यार्थ्यांना रा.से.योजनेच्या विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली. उत्तम कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रा. विजयकुमार भाईदास पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतिश पारधी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, प्रा. व्हि. डी. पाटील, प्रा डॉ दिलीप कदम,प्रा. डॉ. संजय पाटील, प्रा.डॉ. पवन पाटील,प्रा.डॉ. माधव वाघमारे, प्रा.डॉ. जितेंद्र माळी, प्रा. डॉ. संजय महाजन, प्रा. किशोर पाटील,श्री. जगदीश साळुंखे,श्री. सचिन पाटील, श्रीमती मंजुषा गरूड, श्री . दिलीप चव्हाण, श्री.अतुल साळुंखे, श्री. शामकांत पाटील, श्री. सचिन साळुंखे, श्री. दिपक पाटील आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

