लो.शि.मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा.डॉ.प्रभाकर भावे यांना संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
1 min read

लो.शि.मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा.डॉ.प्रभाकर भावे यांना संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

Loading

लो.शि.मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा.डॉ.प्रभाकर भावे यांना संस्थेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

अमळनेर: प्रा.डॉ.प्रभाकर विश्वनाथ भावे यांचे २१ सप्टेंबर २०२४ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. आदरणीय कै.प्रा.डॉ.प्रभाकर विश्वनाथ भावे हे लोकमान्य शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनाने संस्थेने यशस्वी वाटचाल केलेली आहे. त्यांची शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य प्रेरणादायी ठरलेले आहे. लोकमान्य शिक्षण मंडळातील सर्व पदाधिकारी, तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने आदरणीय कै.प्रा.डॉ.प्रभाकर विश्वनाथ भावे यांना आज दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी विद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या शोकसभेत ठरावाचे वाचन करून संस्थेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लोकमान्य शिक्षण मंडळाचे जेष्ठ सदस्य भालचंद्र मंजूळ, उपाध्यक्ष प्रा.धर्मसिंह पाटील, कार्याध्यक्ष अरविंद फुलपागारे, कार्योपाध्यक्ष राजेंद्र खाडिलकर, कार्यचारी सदस्य रमेश बहुगुणे, कार्यकारी सदस्य प्रा.डॉ.प्रभाकर जोशी, कार्यकारी सदस्य राजेंद्र नवसारीकर तसेच लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र मोरे, बाल विकास मंदिराचे मुख्याध्यापिका अनिता वैद्य आणि तिन्ही शाळांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *