समाज कल्याणन्यासचे कार्य हे मानव सेवा हीच ईश्वरसेवा या संकल्पनेतून सेवा सुरू- डॉ. सोन्याभाऊ पाटील
1 min read

समाज कल्याणन्यासचे कार्य हे मानव सेवा हीच ईश्वरसेवा या संकल्पनेतून सेवा सुरू- डॉ. सोन्याभाऊ पाटील

Loading

*जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले! तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा!.*
*समाज कल्याणन्यासचे कार्य हे मानव सेवा हीच ईश्वरसेवा या संकल्पनेतून सेवा सुरू आहे.: डॉ. सोन्याभाऊ पाटील*

ठाणे ( प्रतिनिधी ) *जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले! तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा!.*
समाज कल्याणन्यासचे कार्य हे मानव सेवा हीच ईश्वरसेवा या संकल्पनेतून धर्मसेवक डॉ. सोन्याभाऊ पाटील यांच्या समाजसेवेचा संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत साहित्य वाटप आणि गरजूंना मदत उपलब्ध होत आहे.
भिवंडी परिसरातील मडक्याचा पाडा वाघीवली जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप*
समाजकल्याण न्यास महाराष्ट्र राज्य चे संस्थापक. धर्मसेवक डॉ.सोन्याभाऊ पाटील ,यांचा सहकार्याने,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी , दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, समाजकल्याण न्यासाचे तालुका अध्यक्ष जयदीप यांचा वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील वाघिवली, मडक्याचा पाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वह्या, स्कूल बॅग, आणि मिठाई सोनपापडी, फरसाण बिस्कीट, व्हेपर,असे फराळ वाटप करण्यात आले.यावेळी मनिलाल शिंपी यांनी विद्यार्थ्यांना आनंददायी शनिवार चा अनुषंगाने मनोरंजन केले. शाळेचां शिक्षिका सौ.सुमेधा गंधे यांनी सूत्रसंचलन केले, व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच आजचे सत्कारमूर्ती व वाढदिवस असलेले जयदीप पाटील हे मॅडमचे माजी विद्यार्थी म्हणून परिचित होते जयदीप पाटील यांच्याही शाळेतर्फे त्यांनी भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन केले. यावेळी समाज कल्याणचे तालुका अध्यक्ष विकी पाटील ठाणे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर भोईर शिवसेना उपतालुकाप्रमुख शंकर खारीक यांच्यासह इतरही पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. मडक्याच्या पाड्या तील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजीवन दत्तात्रय गंधे यांनी सर्व शाळा डिजिटल स्वरूपाची स्वखर्चाने केली आहे त्यांचेही यावेळी समाज कल्याण यांच्यावतीने अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले. समाज कल्याण यांच्यावतीने ग्रामीण भागातील मुलांना जी शैक्षणिक मदत होते ते खूप मोलाची आहे असे सांगत प्राथमिक शिक्षिका वनिता तुकाराम जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *