गोविंदा आला रे ••च्या तालावर म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला दहीहंडीचा आनंद
![]()
गोविंदा आला रे ••च्या तालावर म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला दहीहंडीचा आनंद
भुसावळ प्रतिनिधी- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे आला रे गोविंदा च्या तालावर नाचत कुदत फूगड्या खेळत दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. विद्यार्थी विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने दहीहंडीचा आनंद घेतला. मानवी मनोरे करून व प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून उंचावर टांगलेली दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात आली होती .यात शेवटी शाळेतील विद्यार्थी सिद्धु चित्तोडीया याने अचूकपणे दहीहंडी फोडली. तो म्युनिसिपल हायस्कूल चा गोविंदा ठरला त्याचे अभिनंदन करण्यात आले. दहीहंडीचा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ् विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते. तदनंतर मुख्याध्यापक एस. जी. मेढे, डॉ प्रदिप साखरे,जेष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, ज्योती शिरतुरे, रेखा सोनवणे, पुनम देवकर, शिपाई मंदा मोरे यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेट देण्यात आली, दहीहंडीत गोविंदा ठरलेल्या सिद्धू चितोडिया यास शाळेतील ग्रंथपाल अरुण नेटके यांनी २१ रुपयाचे बक्षिस दिले.सर्वांनी गोपाळकाला व भेळचा आस्वाद घेऊन आनंद लुटला यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष मेढे , डॉ. प्रदीप साखरे, एसटी चौधरी डी. के भंगाळे., नाना पाटील,मनोज किरंगे व शिक्षकेतर कर्मचारी प्रविण चौधरी, पूनम देवकर,अरुण नेटके, लक्ष्मण पवार, मंदा मोरे, राजेंद्र बागुल आदींसह सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले..

