विद्यार्थी विद्यार्थिनींशी सजगतेने वागून पालकत्वाचे धनी व्हा-विलास चौधरी
![]()
विद्यार्थी विद्यार्थिनींशी सजगतेने वागून पालकत्वाचे धनी व्हा-विलास चौधरी
शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी, विद्यार्थिनींशी सजगतेने वागून त्यांच्या पालकत्वाचे धनी व्हावे असे विचार सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलासराव चौधरी यांनी स्री सखी समिती व विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थी, विद्यार्थिनी शिस्त व दक्षता या विषयावर आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना आपले विचार व्यक्त केले राज्यांमध्ये शालेय संस्थांमध्ये घडणाऱ्या घडामोडींच्या अनुषंगाने सार्वजनिक विद्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.ते ते पुढे म्हणाले विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या जीवनात शालेय जीवनाला अधिकाधिक महत्त्व असून यासाठी त्यांचे चारित्र्य आणि चरित्र हे घडविण्याच्या दृष्टीने सर्व शिक्षकांनी व परिसरातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील असण्याची आता नितांत गरज असल्याचे मत देखील त्यांनी मांडले. मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी विशेषतः विद्यार्थिनींच्या बाबतीत शालेय परिसरातल्या प्रत्येकाने त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेत त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपापली जबाबदारी ओळखणे अत्यंतिक महत्वाचे असून विद्यार्थी, विद्यार्थिनींना अधिकाधिक संवादी करण्यासाठी त्यांच्यात कौटुंबिक जिव्हाळा निर्माण करत त्यांना बोलके करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत याप्रसंगी मांडले बैठकीस पर्यवेक्षक एल.जे पाटील, ज्येष्ठ शिक्षक डी.जी. महाजन व सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाखा समिती प्रमुख वृषाली चौधरी यांनी तर आभार स्री सखी समिती प्रमुख चारूलता टोके यांनी मानले.

