अमळनेरला उदया श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन
![]()
अमळनेरला उदया श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी
कृष्ण जन्माष्टमी (अर्थ: कृष्णाच्या जन्माचा प्रसंग) ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.अमळनेर येथील युवा कार्यकर्ते सौरभ पाटील यांच्या कडे दरवर्षी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो..यावर्षी हि
उदया श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व भजनाचा कार्यक्रम श्रावण कृ।।८ शके १९४६ सोमवारी आयोजित केला आहे..
सविस्तर माहिती अशी कि आपणांस कळविण्यात आनंद होतो की, श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व भजनाचा कार्यक्रम श्रावण कृ।।८ शके १९४६ सोमवार दि.२६।०८।२०२४ रोजी रात्री ८ ते १२ वाजता करण्याचे योजिले आहे. तरी आपली सहकुटूंब सहपरिवार उपस्थिती प्रार्थनिय आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण समर्थ नगर, देवाज हॉटेल समोर, धुळे रोड, अमळनेर जि. जळगांव येथे आहे असे कार्यक्रम आयोजक श्रीमती मिराबाई मधुकर पाटील श्री. लोटन मधुकर पाटील ,सौ. प्रतिभा लोटन पाटील , युवा सामाजिक कार्यकर्ते चि. सौरभ लोटन पाटील यांनी केले आहे..


