गजानन माध्यमिक विद्यालय राजवड येथील शिक्षिकेचा अभिनव उपक्रम, देशातील जवानांना रक्षाबंधन निमित्ताने पाठवल्या राख्या..
1 min read

गजानन माध्यमिक विद्यालय राजवड येथील शिक्षिकेचा अभिनव उपक्रम, देशातील जवानांना रक्षाबंधन निमित्ताने पाठवल्या राख्या..

Loading

पारोळा प्रतिनिधी

बबिता पटेल यांचा अभिनव उपक्रम.
गजानन माध्यमिक विद्यालय राजवड आदर्शगाव तालुका पारोळा जिल्हा जळगाव या शाळेतील उपक्रमशील आदर्श शिक्षिका बबिता उस्मान पटेल यांनी देशसेवेतील जवानांना रक्षाबंधन निमित्ताने राख्या पाठवून विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाची भावना प्रेरित केली .विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या कलाकृतीतून नाविन्यपूर्ण राख्या तयार केल्या .राखी तयार करताना विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम चेहऱ्यावर झडकत होते .राख्या तयार करताना त्यांनी पर्यावरण स्नेही राख्या बनवण्याचा प्रयत्न केला . नेहमी भविष्यवेधी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात . प्रत्येक विद्यार्थ्यातील कलागुण ओळखून त्या विद्यार्थ्याला पुढे जाण्यासाठी विविध उपक्रमातून संधी देत असतात . बबिता पटेल यांनी आतापर्यंत वृक्षसंवर्धन , पर्यावरण रक्षण ,किशोरवयीन मुलींचा मेळावा, मूल्यशिक्षण,भाषिक गणितीय, वैज्ञानिक तसेच बौद्धिक उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा त्या नेहमी प्रयत्न करत असतात . या यशस्वीतेसाठी मा. आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, जिजामाता कृषीभूषण पुष्पलता पाटील, सचिव लोटन देसले, सरपंच पुष्पलता पाटील, मुख्याध्यापक योगेश सूर्यवंशी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *