आज रोजी दिनांक नावाशिवाय वाहतूक पोलीस यांची धाडसी व कौतुकास्पद कामगिरी, नावासेवा अटल सेतू ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या महिलेस वाहतूक पोलिसांच्या धाडसीपणामुळे वाचवण्यात यश
1 min read

आज रोजी दिनांक नावाशिवाय वाहतूक पोलीस यांची धाडसी व कौतुकास्पद कामगिरी, नावासेवा अटल सेतू ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या महिलेस वाहतूक पोलिसांच्या धाडसीपणामुळे वाचवण्यात यश

Loading

आज रोजी दिनांक नावाशिवाय वाहतूक पोलीस यांची धाडसी व कौतुकास्पद कामगिरी,
नावासेवा अटल सेतू ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या महिलेस वाहतूक पोलिसांच्या धाडसीपणामुळे वाचवण्यात यश

ठाणे:(मनिलाल शिंपी)
16जून 2024 रोजी सायंकाळी 19:06 वाजेच्या सुमारास अटल सेतूवरून नावाशेवा वाहतूक शाखा पेट्रोलिंग वन वर कॉल आला अटल सेतू ब्रिज मुंबईकडून शेलगर टोल नाक्या कडे जाणाऱ्या लेन 12.4 अंतरावर स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 02 FX1686 ही रस्त्यात थांबली असून कार मधील एक महिला ब्रिजच्या रेलिंग क्रॉस करून काहीतरी करीत आहे . त्यावरून पेट्रोलिंग 1 वाहनावर वर असलेले 1)पोलीस नाईक 3018 ललित शिरसाठ 2) पोलीस नाईक 2322 किरण मात्रे 3) पोलीस शिपाई 4341 यश सोनवणे हे सदर ठिकाणी पोहोचताच महिला नामे रीमा मुकेश पटेल वय 56 वर्ष गृहिणी राहणार मुलुंड मुंबई यांनी ब्रिजवरून उडी घेण्याचा प्रयत्न केला असता वरील पोलीस अंमलदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कसोशीने प्रयत्न करीत तिला सुरक्षित वर काढले.वाहतूक पोलिस अधिकारी यांचा धैर्यामुळे धाडसीपणामुळे आज या महिलेचा प्राण वाचवण्यात यश आले आहे. या धाडसी पोलीस बांधवांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *