मातोश्री सेवाभावी संस्था व देसले हॉस्पिटलतर्फे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५० रुग्णांची तपासणी!
1 min read

मातोश्री सेवाभावी संस्था व देसले हॉस्पिटलतर्फे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५० रुग्णांची तपासणी!

Loading

मातोश्री सेवाभावी संस्था व देसले हॉस्पिटलतर्फे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५० रुग्णांची तपासणी!

निजामपूर-जैताणे (ता.साक्री) येथील मातोश्री सेवाभावी संस्था व देसले हॉस्पिटल, साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात शनिवारी (ता.३) सुमारे ५० गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली. जैताणेचे उपसरपंच बाजीराव पगारे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रा.नरेंद्र तोरवणे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.

क्रांतिसूर्य महात्मा फुले, ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले व स्व.रंजना जगदाळे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुलेंचे संक्षिप्त चरित्र भेट देऊन मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. दरम्यान आरोग्य कर्मचारी संगीता वाघमोडे यांच्या मुलाला नुकत्याच झालेल्या नीटच्या परीक्षेत ६४७ गुण मिळाल्याने त्यांनाही मातोश्री सेवाभावी संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले. प्रा.नरेंद्र तोरवणे, उपसरपंच बाजीराव पगारे, डॉ.स्नेहल देवरे-अहिरराव, डॉ.स्वप्नील भदाणे यांनी मनोगत व्यक्त केले.

मातोश्री सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे, सचिव सुशीलकुमार जगदाळे, संचालक भारत जाधव, भय्या गुरव, विवेक जगदाळे, इंद्रजित खैरनार, समाधान खैरनार, बबलू देवरे आदींनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षवर्धन चित्तम व वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश गावित यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले. प्रा.भगवान जगदाळे यांनी आभार मानले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *