जिल्हा परिषद अंबारे शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रदीप कंखरे सेट परीक्षेत यश…
1 min read

जिल्हा परिषद अंबारे शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रदीप कंखरे सेट परीक्षेत यश…

Loading

जिल्हा परिषद अंबारे शाळेचे उपक्रमशील शिक्षक
प्रदीप कंखरे सेट परीक्षेत यश…

अमळनेर प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तर्फे 7 एप्रिल 2024 रोजी घेण्यात आलेल्या MH-SET परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून त्यात नियमित ज्ञानाची कास धरणारे,स्वत:च्या अभ्यासात अद्ययावत ठेवण्याचा सदोदीत प्रयत्न करणारे श्री.प्रदीप रावण कंखरे,उपशिक्षक जि.प.शाळा अंबारे ता. अमळनेर हे मराठी विषय घेऊन पात्र ठरले आहेत.यापूर्वी ही ते डिसे. 2024 च्या UGC- NET परीक्षेत ही पात्र ठरले होते. “दिसामाजी काही तरी वाचे-वदावे …” या समर्थ रामदासस्वामी यांच्या उक्ती प्रमाणे वागणारे श्री. प्रदीप कंखरे सर हे आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक धडपडणारे व्यक्तिमत्व आहे.
या यशाबद्दल त्यांचे म. गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे मॅडम, पं.स. अमळनेर ,केंद्रप्रमुख किरण शिसोदे केंद्र शाळा अंतुर्ली- रंजाणे,ता.अमळनेर तसेच अमळनेर तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी संपूर्ण मित्रपरिवार हितचिंतकांकडून अभिनंदन केले आहे.कंखरे सरांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..

 

प्रदीप कंखरे सर अत्यंत मितभाषी अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे त्यांनी आजतागायत आपल्या शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत.. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल मराठी लाईव्ह न्युज च्या वतीने त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा!! त्यांची उत्तरोत्तर शैक्षणिक प्रगती हो..

संपादक -मराठी लाईव्ह न्युज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *