*क्रांती दिन,शुक्रवार दि.9 ऑगस्ट 24 रोजी निदर्शने आंदोलन…!!!
1 min read

*क्रांती दिन,शुक्रवार दि.9 ऑगस्ट 24 रोजी निदर्शने आंदोलन…!!!

Loading

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)!!!*
*************************
*महा.फेडरेशन अपडेट्स!✍️*************************
*क्रांती दिन:शुक्रवार दि.9 ऑगस्ट 24 रोजी निदर्शने आंदोलन…!!!*
*************************
मित्रांनो,
राज्य शासकीय,निमशासकीय कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शुक्रवार दि.9 ऑगस्ट (क्रांतिदिन) व रविवार दि 11 ऑगस्ट(चेतना दिन) या ऐतिहासिक दिनांचे औचित्य साधून जुनी पेंशन योजना लागू करण्यासंबंधी कार्यवाही करणेबाबत शासन स्तरावरील कूर्मगती टाळून राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जुनी पेंशन लागू कारानेसंबंधी संबंधी
*शासनाने समन्वय समितीस दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शासन आदेश प्रसृत करावेत.या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दि.9 ऑगस्ट 2024 रोजी एक दिवसीय निदर्शने आंदोलन आयोजित केलेले आहे.*
या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी व एकवाक्यता कायम रहावी म्हणून काही जिल्ह्यातील मित्रांच्या संदर्भासाठी पुढील बाबी लक्ष्यात घेऊन आपापल्या जिल्ह्यातील आंदोलनाचे नियोजन व आयोजन करावे.असे आवाहन करण्यात येत आहे.
(1) निदर्शन आंदोलन फक्त शुक्रवार दि.9 ऑगस्ट 2024 या कार्यालयीन दिवशी आयोजित करावयाचे आहे.
(2) निदर्शने आंदोलन आपल्या जिल्ह्यातील समन्वय समितीशी समन्वय साधून यांचेसह शासकीय कार्यालयासमोर संयुक्तपणे संपन्न करावयाचे आहे.
*(3) “निदर्शने आंदोलन” शाळेत/शाळेसमोर करणे अभिप्रेत नाही.*
(4) आपल्या फेडरेशन संलग्न ज्या शहर/ जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेस स्थानीय परिस्थितीनुसार स्वतंत्रपणे आंदोलनाचे आयोजन करणे आवश्यक असेल
त्यांनी तहसिलदार/ जिल्हाधिकारी यांचे कार्यालयांसमोर निदर्शने करावीत.
(4) दि.9 ऑगस्ट 2024 च्या आंदोलनाची नोटीस शासनास राज्य समन्वय समितीने दिलेली असल्याने आपल्या शहर/ जिल्हा संघटनेच्या वतीने नेहमीच्या आंदोलन संहितेप्रमाणे जिल्ह्यातील संबंधित कार्यालयास आंदोलनाची पूर्व सूचना द्यावी.तसेच आपल्या संघटनेच्या लेटरपॅडवर आंदोलनाविषयीचे मागणी/निवेदन देण्यात यावे.
(5)दि.9ऑगस्ट या दिवशी काही जिल्ह्यांमध्ये जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी संघटनांकडून रॅली चे आयोजन करण्यात येते.
(उदा.पालघर) अश्यारीतीने ज्या जिल्ह्यांमध्ये रॅली अथवा अन्य कार्यक्रमांचे सार्वजनिकरित्या आयोजन करण्यात आलेले आहे.त्या कार्यक्रमात आदिवासी शिक्षक बंधू,भगिनींच्या सहभागाची शक्यता लक्ष्यात घेवून रॅली/अन्य कार्यक्रम याचे
वेळापत्रक लक्ष्यात घेऊन आपल्या संघटनेच्या निदर्शन आंदोलनाची वेळ निश्चित करावी.
(6)काही जिल्ह्यांमध्ये नागपंचमी अथवा अन्य कारणांस्तव जिल्हाधिकारी साहेबांनी सार्वत्रिक सुट्टी जाहीर केल्याने त्या जिल्ह्यातील शाळा व शासकीय कार्यालये यांना असलेली सुट्टी लक्ष्यात घेवून निदर्शने करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.तथापि अश्या जिल्ह्यांतील शहर/जिल्हा संघटनेच्या प्रतिनिधी मंडळाने सोमवार दि.12 ऑगस्ट 24 रोजी मा.जिल्हाधिकारी यांना निदर्शन आंदोलनाची पार्श्वभूमी व मागण्यांचे निवेदन देण्यात यावे.
(7)महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)व्यतिरिक्त काही जिल्ह्यातील विविध संघटना आपापल्या मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने जाहीर करीत असतात.अशी आंदोलने करणे हा प्रत्येक संघटनेचा अधिकार आहे.या अधिकाराचा आपण सन्मान केला पाहिजे.मात्र फेडरेशन निर्देशित नसलेल्या कोणत्याही आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे किंवा नाही?याचा निर्णय संबंधित जिल्हा संघटनेने आपल्या स्तरावर घ्यावा.
*फेडरेशनने जाहीर न केलेल्या आंदोलनांसंबंधी फेडरेशन कडे काही जिल्ह्यातून वारंवार केल्या जाणाऱ्या चौकशी/शंका यांची पुनरावृत्ती टाळावी अशी विनंती करण्यात येत आहे.*
(8) दि.9 ऑगस्ट 2024 च्या निदर्शने आंदोलनाचे /निवेदन देतांनाचे फोटो फेडरेशन ग्रुपवर दि.13 ऑगस्ट 2024 पर्यंत पोस्ट करावेत.
उपरोक्त बाबी लक्षात घेवून आपल्या संघटनेच्या वतीने आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
धन्यवाद!
ज्ञानेश्वर कानडे.अध्यक्ष
एस.डी. भिरुड,सेक्रेटरी
समस्त पदाधिकारी,कार्यकारी मंडळ,महाराष्ट्र फेडरेशन.
पालघर
ऑगस्ट 6,2024(11.21 am.)
प्रत रवाना:
समन्वय समिती,मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *