ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे सर्व मुख्य स्त्रोतांचे जलजन्य साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन अडावद आरोग्य केंद्राकडुन केले सुप्रक्लोरीनेशन.
1 min read

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे सर्व मुख्य स्त्रोतांचे जलजन्य साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन अडावद आरोग्य केंद्राकडुन केले सुप्रक्लोरीनेशन.

Loading

ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे सर्व मुख्य स्त्रोतांचे जलजन्य साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन अडावद आरोग्य केंद्राकडुन केले सुप्रक्लोरीनेशन.

सर्व अडावद आरोग्य केंद्रांतर्गत
सुटकार/वडगांव बु/चांदसनी/रुखनखेडा प्र. ग्रामपंचायत येथील पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतांचे सुपरक्लोरीनेशन करण्यात आले.
अजूनही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील मुख्य स्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदिप लासुरकर यांनी सांगितले.

यासाठी सर्व आरोग्य सेवक-सहाय्यक, सर्व सरपंच, सर्व जलसुरक्षक, सर्व ग्रामसेवक यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

आज गावापासून २ ते ३ किमी अंतरावर, पीरबाबा दर्ग्यानजीक असलेल्या बोरवेलचे, प्लॉट बोरवेल, चांदसनी, कमळगाव शेतशिवार ट्यूबवेल,वडगांव बु., रुखनखेडा प्र., पिंप्री, आदी सर्व मुख्य स्त्रोतांचे बोरवेल सुपरक्लोरीनेशन करतांना.. प्र.आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, सुनील महाजन, वडगांव चे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.भुषण देशमुख,संतोष भांडवलकर यांनी केले शुद्धीकरण करून घेतले.

प्रसंगी सोबत सुटकार ग्रामपंचायतचे
लोकनियुक्त सरपंच-रवींद्र भगवान ठाकरे, वडगांव बु.चे सरपंच पती-गणेश पाटील, जलसुरक्षक-भगवान पाटील, प्रवीण थोरात, प्रवीण सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रवीण कोळी, महेंद्र ठाकरे,भीमराव पाटील, आदी सर्व जलसुरक्षक उपस्थित होते.

बोरवेलचे क्लोरीनेशन झाल्यानंतर किमान ८ तासांनी बोरवेल सुरू करणे आवश्यक असून, मगच पाणी पुरवठा करण्यासाठी बोरवेलचं पाणी सुरू करावे, या व इतर सूचना ग्रामपंचायतला देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *