प्रज्ञाच्या प्रज्ञेची सातसमुद्रापार गगनभरारी
1 min read

प्रज्ञाच्या प्रज्ञेची सातसमुद्रापार गगनभरारी

Loading

प्रज्ञाच्या प्रज्ञेची सातसमुद्रापार गगनभरार

अमळनेर प्रतिनिधी
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हेवा वाटे देवा ॥
या अभंगाच्या ओळी जगण्याचे भाग्य ज्या आई वडिलांना मिळते ते भाग्यवान असतात.आपल्या परिवारातील सदस्य श्री.दिनकर पाटील सर आणि मनिषा ताई यांच्या संस्कार व शिक्षणाचा झेंडा त्यांच्या मुलीने साता समुद्रापार लावला आहे. दिनकर पाटील यांचे लहान बंधू भास्कर पाटील भालोद येथे माध्यमिक शिक्षक आहेत.
नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल चे शिक्षक दिनकर पाटील सर यांची जेष्ठ कन्या प्रज्ञा दिनकर पाटील हिची अमेरिकेतील खाद्य क्षेत्रातील अग्रगण्य मल्टिनॅशनल कंपनी General Mills मध्ये निवड झाली आहे.
श्री दिनकर पाटील सर हे एरंडोल तालुक्यातील खडके येथील रहिवासी आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन यश मिळवले. कुटुंबाला पुढे नेले.त्यांच्या पत्नी मनिषा पाटील मॅडम कडगाव येथे उपमुख्याध्यापिका आहेत.
प्रज्ञा पाटील हिला वार्षिक १२ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. प्रज्ञा पुणे येथील कमिन्स कॉलेजची बीटेक कॉम्प्युटर सायन्स ची विद्यार्थिनी आहे. याच कंपनीत तिने आंतरवासिता पूर्ण केली. विशेष म्हणजे पदवीच्या शेवटच्या वर्षी असताना तिला हे यश मिळाले आहे .
प्रज्ञा सारख्या मुली कुळाचा उद्धार करतात आणि अश्या मुलींमुळे आई वडिलांचा हेवा साक्षात देवाला वाटतो. दिनकर सर आणि परिवाराचे अभिनंदन !
डॉ जयदीप पाटील नोबेल फाउंडेशन
जळगाव यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *