गजानन माध्यमिक विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरा..
1 min read

गजानन माध्यमिक विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरा..

Loading

गजानन माध्यमिक विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरा..

राजवड आदर्शगांव तालुका पारोळा येथील छत्रपती कृषी विज्ञान मंडळ संचलित, गजानन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तर लोकमान्य टिळक यांचे पुण्यतिथी निमित्ताने धाबे जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शिवश्री रामेश्वर भदाने सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
अमळनेर येथील प्रा. अशोक पवार यांच्या युवा प्रतिष्ठान संस्था तसेच अमळनेर तालुका मराठा समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर धरणगाव पारोळा या तीन तालुक्यात दिनांक एक ऑगस्ट रोजी एकाच दिवशी तीन तालुक्यातील विविध शाळांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमासाठी 201 व्याख्याते यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन युवा प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने कार्यशाळेत करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना बालवयात विविध महापुरुषांच्या जीवनकार्याचा संघर्षमय इतिहास कळावा व त्यांच्या अंगी चांगले संस्कार व मूल्य रुजूवावेत हा हेतू डोळ्यासमोर ठेवून 201 व्यक्त्यांनी 201 संस्थांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केले.
गजानन माध्यमिक विद्यालय राजवड येथे रामेश्वर भदाने सरांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊंच्या जीवनपट अतिशय हुबेहुब सांगितला. विद्यार्थ्यांनीही लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपली भाषणे सादर केलीत.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक योगेश सूर्यवंशी सर, विद्यार्थी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू व भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील इंग्रजी विषयाचे उपशिक्षक ज्ञानेश्वर पाटील सर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा पाटील मॅडम तर प्रास्ताविक बबीता पटेल मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन निलेश सूर्यवंशी सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *