वाहन चालकांचे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १०३७ खटले दाखल  कोळसेवाडी वाहतूक शाखेची कौतूकास्पद कामगिरी.
1 min read

वाहन चालकांचे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १०३७ खटले दाखल कोळसेवाडी वाहतूक शाखेची कौतूकास्पद कामगिरी.

Loading

वाहन चालकांचे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १०३७ खटले दाखल

कोळसेवाडी वाहतूक शाखेची कौतूकास्पद कामगिरी.

ठाणे:कल्याण : ( मनिलाल शिंपी)
वाहतूक पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड,वाहतूक विभाग ठाणे शहर यांचे आदेशान्वये व माननिय सहाय्यक पोलीस आयुक्त संजय साबळे,कल्याण वाहतूक विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी वाहतूक उपविभाग कल्याण पूर्वचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन सांडभोर यांचे कोर्ट टीमने लोक अदालतचे अनुषंगाने माननिय न्यायदंडाधिकारी कल्याण कोर्ट येथे कसूरदार वाहन चालकांचे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक खटले 1037 एवढे दाखल करून,एकूण 10,62,850/- (दहा लाख बासष्ट हजार आठशे पन्नास) रुपयांचा भरणा न्यायालयात केला आहे.

प्रसंगी माननिय सहायक पोलीस आयुक्त,श्री संजय साबळे कल्याण वाहतूक विभाग यांनी कोळशेवाडी वाहतूक उपविभाग कल्याण पूर्व सर्व कोर्ट टीमचे अधिकारी अंमलदार यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व यापुढे देखील अशाच प्रकारे चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहित केले.

शिवाय नागरिकांना आवाहन केले आहे. की,लोक आदालत मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने त्यांचे वाहनांवर प्रलंबित दंड सवलतीसह भरून आपले वाहनावर होणारी कायदेशीर कारवाई टाळावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *