ओम इंटरनॅशनल स्कूल डायघर येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.
1 min read

ओम इंटरनॅशनल स्कूल डायघर येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.

Loading

ओम इंटरनॅशनल स्कूल डायघर येथे मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) ओम पब्लिक स्कूल कॅफे नगर डायघर (B.K. रिसॉर्ट रोड) येथे खरबे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गोपीनाथ खरबे वाढदिवसानिमित्त ओम पब्लिक स्कूल शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने पहिली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धेत शाळेतील विविध वर्गातील विद्यार्थी गट व पालक सहभागी झाले होते ,यामध्ये 5 कि. मी ,3 कि. मी , 2 की. मी .व लहान गटाकरिता 1की.मी.असे नियोजन केले होते.या स्पर्धेतील विजेत्यांना मेडल व रोख पारितोषिक (रोख रक्कम) देऊन संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर खरबे व शाळेच्या मुख्याध्यापिका विजेता सिन्हा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा बनगर सर यांना आमंत्रित करण्यात आले होते. तसेच गोपीनाथ खरबे ,अजित सिन्हा,किरण देसले, व कल्याण तालुका शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रा.लक्ष्मण इंगळे उपस्थित होते,
सदर मॅरेथॉन यशस्वी करण्याकरता शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी विशेष मेहनत घेतली त्यामुळे प्रथम वर्ष असून सुद्धा किमान २५० ते ३०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *