नवनिर्वाचित शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांचा दिनांक २७ जुलै रोजी जाहीर सत्कार
1 min read

नवनिर्वाचित शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांचा दिनांक २७ जुलै रोजी जाहीर सत्कार

Loading

नवनिर्वाचित शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांचा दिनांक २७ जुलै रोजी जाहीर सत्कार
नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार किशोरजी दराडे यांच्या दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल समता शिक्षक परिषद व माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या वतीने जाहीर सत्कार समारंभाचा कार्यक्रम दिनांक २७/७/२०२४ शनिवार रोजी दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात आयोजित केला असून याप्रसंगी जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे संस्थापक राज्याध्यक्ष मा. डी. के. अहिरे राहणार असून डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे ,माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन समता शिक्षक परिषद व माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *