राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताह साजरा
1 min read

राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताह साजरा

Loading

राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताह साजरा

पारोळा प्रतिनिधी

राणी लक्ष्मीबाई कनिष्ठ महाविद्यालय पारोळा येथे शिक्षण सप्ताह साजरा होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 दरम्यान शिक्षण सप्ताह साजरा होत आहे. यामध्ये शिक्षण आणि विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. या सप्ताहातील दुसरा दिवस हा मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस (FLN Day) म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान उद्दिष्टे, महत्त्व आणि जाणीव जागृती या अनुषंगाने गणितीय कथाकथन, गणिती खेळ, गणितीय कोडी तसेच गणित तज्ज्ञांची माहितीचे सादरीकरण असे विविध उपक्रम घेण्यात आले. सप्ताहातील दुसऱ्या दिवसाचे समन्वयक म्हणून डॉ. ईश्वर एस. पाटील यांनी काम पाहिले. शिक्षण सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. वंदना एस. पाटील आणि शिक्षण सप्ताहाचे समन्वयक प्रा. ए. ए. मोरे यांनी अनमोल सहकार्य केले. या उपक्रमात एकूण 11 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दुसऱ्या दिवसाच्या समिती सदस्य म्हणून प्रा. पंकज बाविस्कर, प्रा. पी. पी. पाटील, प्रा. एस. डी. वानखेडे, प्रा. विजय पाटील, प्रा. किरण पाटील या सर्वांनी उपक्रम चांगला होण्यासाठी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *