प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना-स्नेहभोजन आयोजन…
![]()
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना-स्नेहभोजन आयोजन…
आज शनिवार,दि.२० जुलै २०२४ रोजी कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर, जळगाव विद्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत मा.श्री.खलील शेख साहेब (विस्तार अधिकारी पंचायत समिती जळगाव) व मा.श्री.विजय पवार साहेब (अधिक्षक, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना,पं.स.जळगाव) या मान्यवरांच्या उपस्थितीत स्नेहभोजन आयोजित करण्यात आले.
सुरुवातीला मा.खलील शेख व मा.श्री.विजय पवार साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन शालेय प्रशासनातर्फे मुख्याध्यापक डॉ रवीन्द्र माळी यांनी *स्वागत* केले.
सदर उपक्रमात शाळेतील *इ.१ ली ते ४ थी विद्यार्थ्यांनी सहभाग* घेतला.त्यातील *रुपाली निकुंभ,खिलेश्वरी हिवराळे, हर्षवर्धन देवरे (इ.३ री) व तेजल पवार,कृतिका करोशिया,श्रेयस पांचाळ,राजरत्न पारधे (इ.४ थी)* इ.विद्यार्थ्यांनी शाळेतील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत आपले *मनोगत व्यक्त* केले.मनोगतात विद्यार्थ्यांना योजनेचे महत्त्व,आहाराची गुणवत्ता व चव तसेच शालेय परिसरातील स्वच्छता इ.मुद्दे मांडले.
तद्नंतर मा.खलील शेख साहेबांनी विद्यार्थ्यांशी हितगूज साधतांना आहाराचे जीवनातील महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.त्याचप्रमाणे मा.श्री.विजय पवार साहेबांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले व शासनाच्या योजनेचा परिपूर्ण लाभ प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना प्रयत्नपूर्वक देण्यात यावा असे आवाहन केले.
उपक्रमाच्या शेवटी मा.खलील शेख साहेब व मा.श्री.विजय पवार साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांसह आज शनिवार रोजीचा आहाराचा पदार्थ मसालेदार खिचडी व जिलेबी यांचा आस्वाद स्नेहभोजनात घेतला.साहेब आपल्या शाळेत आपल्या शेजारी बसून जेवले याचा सर्वच विद्यार्थ्यांना अत्यानंद झाला.विद्यार्थ्यांनी मनसोक्त स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
आज मा.खलील शेख साहेब व मा.श्री.विजय पवार साहेब आमच्या विद्यालयात आलेत व विद्यार्थ्यांना व आम्हाला मार्गदर्शन केले.आमचा उत्साह वाढवला त्याबद्दल *दोन्ही साहेबांचे मनापासून आभार…*
उपक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नरेंद्र वारके यांनी केले.शाळेतील सर्व शिक्षक व शालेय पोषण आहार योजना कर्मचारी यांनी सहकार्य केले.
*डॉ.रवीन्द्र माळी*
मुख्याध्यापक
कमल राजाराम वाणी
बालनिकेतन विद्यामंदिर, जळगाव

