सार्वजनिक विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत २४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
![]()

असोदा-सार्वजनिक विद्यालयातील इयत्ता पाचवी व आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा, मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल,पर्यवेक्षक एल. जे. पाटील डी.जी. महाजन तसेच माजी विद्यार्थिनी माधुरी चौधरी यांची उपस्थिती होती. इयत्ता पाचवीतील १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत तर आठवीतील १० विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. संस्थाध्यक्ष विलास चौधरी, चेअरमन उद्धवराव पाटील, सचिव कमळाकर सावदेकर संस्थेचे सर्व संचालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.सूत्रसंचालन शुभांगीनी महाजन तर आभार वृषाली चौधरी यांनी मानले.

