संत सोमगीर विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
![]()
संत सोमगीर विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
भिलाली ता.पारोळा – श्री स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ भादली खुर्द संचलित श्री संत सोमगिर माध्यमिक विद्यालय भिलाली ता.पारोळा जि. जळगाव येथे शाळेत असलेले उपशिक्षक विशाल जाधव यांनी शाळेतील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले
शाळेचा विद्यार्थी ओम जगन धाडसिंगार हा इयत्ता 8 वी तील अत्यंत होतकरू प्रामाणिक आणि उत्तम वाद्य वादक व शाळेच्या लेझीम पथकाचा प्रमुख वादक असलेला ओम याची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीचे पण शिक्षणाची आवड व वादनाच्या आवडीने शाळेशी जुळलेला अशा विद्यार्थ्यास वह्या, कंपास, चित्रकला वही ,स्केचपेन ,कलर इत्यादी साहित्य देऊन प्रोत्साहित करण्यात आले
कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील यांनी केले व संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश पाटील, हरेश्वर पाटील , वाल्मिक पाटील , विकास पाटील, गुणवंत साळुंखे ,रवींद्र मोरे, भाग्यश्री पाटील ,रूपाली पाटील ,आस्तिक पाटील, अरुण पाटील ,रंगराव पाटील, योगेश पाटील ,अविनाश भिल यांनी परिश्रम घेतले

