मेघ दाटुनी येता … चिंब पावसाच्या कविता काव्य अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन.
1 min read

मेघ दाटुनी येता … चिंब पावसाच्या कविता काव्य अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन.

Loading

मेघ दाटुनी येता … चिंब पावसाच्या कविता काव्य अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन.

जळगाव: खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आणि कान्ह ललित कला केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.११ जुलै रोजी दुपारी ३:३० वाजता मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या जुना कॉन्फरन्स हॉल येथे मेघ दाटुनी येता… चिंब पावसाच्या कविता या काव्य अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवींच्या कवितांचे गायन व अभिवाचन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.सं ना.भारंबे, के.सी.ई. सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक मा.शशिकांत वडोदकर, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. आर.बी.ठाकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे लेखन व निवेदन प्रा.गणेश सूर्यवंशी, अभिवाचन डॉ.श्रद्धा पाटील व गायन प्रा.ईशा वडोदकर करणार आहेत. तरी काव्य रसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे असे संयोजकांनी आवाहन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *