‘कर्नाटक राज्यात’ ‘गुलबर्गा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात खान्देश कवी प्रा.वा.ना.आंधळे यांचा निवडक फर्मान काव्यसंग्रह’
1 min read

‘कर्नाटक राज्यात’ ‘गुलबर्गा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात खान्देश कवी प्रा.वा.ना.आंधळे यांचा निवडक फर्मान काव्यसंग्रह’

Loading

‘कर्नाटक राज्यात’ ‘गुलबर्गा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात खान्देश कवी प्रा.वा.ना.आंधळे यांचा निवडक फर्मान काव्यसंग्रह’

एरंडोल : येथील सुप्रसिद्ध कवी तथा गझलकार कवी प्रा.वा.ना.आंधळे यांचा ‘निवडक फर्मान’ हा काव्यसंग्रह कर्नाटक राज्यातील गुलबर्गा विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमाअंतर्गत बी.एस्सी. आणि बी.सी.ए. या विद्याशाखांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून १०० गुणांसाठी लागू करण्यात आला आहे. गुलबर्गा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाकडून प्रा.आंधळे यांना यासंदर्भाचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.
प्रा.आंधळे यांची एक कविता याच शैक्षणिक वर्षापासून गुजरात राज्य शाळा शालेय अभ्यास मंडळाने इयत्ता ६वी साठी प्रकाशित केली असून प्रा.आंधळेंच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, उच्च माध्यमिक मंडळापासून महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या विविध शाखांतील पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी कविता सामाविष्ट झाल्या आहेत. खान्देशातील एरंडोल सारख्या ग्रामीण भागातील या कवीची कविता महाराष्ट्रासह गुजरात व कर्नाटक राज्यापर्यंत पोहचल्याचा आनंद शैक्षणिक व सामाजिक परिघात व्यक्त केला जातोय .
प्रा.आंधळे यांची काव्यलेखन साधना चाळीस वर्षांपासून आहे. अनुष्टुभ, किर्लोस्कर, अस्मितादर्श, अक्षर वैदर्भी, सुगावा, मनोहर, लोकप्रभा या वाङ्मयीन नियतकालिकांसह पाचशे दिवाळी अंकातून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. तीन वेळा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या प्रा.आंधळे यांनी शाळा-महाविद्यालयांपासून व्याख्यान मालेतील व्याख्यानांनी संपूर्ण महाराष्ट्राला रसिक प्रिय वक्ता म्हणूनही आपली ओळख दृढ केलीय. त्यांच्या या यशदायी वाटचालीचे समाजातल्या विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *