लोककल्याणकारी राजा राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची स्वराज्य देशा तर्फे जयंती साजरी
1 min read

लोककल्याणकारी राजा राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची स्वराज्य देशा तर्फे जयंती साजरी

Loading

लोककल्याणकारी राजा राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची स्वराज्य देशा तर्फे जयंती साजरी

स्वराज्य देशा महाराष्ट्र देशाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या तर्फे महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राजर्षी शाहू हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जातात. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात.या जयंती निमित्त स्वराज्य देशा टिम चे रामसिंग भैया सलामपुरे,प्रा.व्यंकट होनाळे, डाॅ.भरत सलामपुरे,गोपाळ हालसे, रूपालीताई पाटील,विशाखा रूपल शिवव्याख्याते अक्षय लोखंडे, निलेश कासार, गणेश जाधव, विनोद यादव,पोपट मरकड, रामराम अनंमवाड,कमलेश देशमुख, शंतनु भागवत,रवी सोमासे,हर्षल पाटील, अशोक पालवे राजकुमार बेडगे, मनिषा बेडगे,तनया बेडगे या जयंतीनिमित्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *