1 min read

व्हि.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Loading

व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै.श्री.दादासाहेब व्ही. एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे चेअरमन आदरणीय श्री.उत्कर्ष पवार तसेच संस्थेच्या सचिव सौ.अलका पवार यांच्या अध्यक्षतेखाली या योगसत्राचे आयोजन केले होते.
“योग म्हणजे जागरण. हे जगामध्ये अधिक सौंदर्य आणि अधिक प्रेम आणणारे जीवन निर्माण करण्याबद्दल आहे”. शाळेत योग सत्राची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि ध्यानाने झाली जो योगाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे आणि जो आपल्याला आपल्या मनाच्या वास्तविक स्वरूपाशी जोडतो.
शहरातील प्रसिद्ध योग प्रशिक्षक माननीय श्री.रघुनाथ चौधरी यांच्या मार्गदर्शन व प्रशिक्षणाखाली विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले. यावेळी सरांनी दैनंदिन जीवनातील योगाचे महत्व समजावून सांगितले. श्री.
चौधरी सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षकांनी विविध प्रकारची योगासने व योग प्रात्यक्षिके केली.ध्यान,सूर्यनमस्कार,कपाल भारती अनुलोम-विलोम,शीर्षासन, मयुरासन आदी प्रकारची योगासने केली.
दरम्यान संस्थेच्या सचिव सौ. अलका पवार यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाबाबत विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वर्षा सोहिते आणि उपाध्यक्ष श्री. उमाकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
शाळेच्या शिक्षिका योगिता फाळके, पल्लवी येवले, स्वाती चव्हाण,मनीषा सोनार, संगीता पाटील, मनीषा ठाकूर,कविता पाटील, प्रतीक्षा पाटील, रोशनी पाटील, शिक्षकेतर कर्मचारी योगिता पारधी यांनी या सत्रात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्यांचे सहकार्य लाभले.
शेवटी संस्थेचे चेअरमन माननीय श्री. उत्कर्ष पवार यांच्या, ” योग हा मन आणि शरीराची एकता, संयम,पूर्तता आणि मनुष्य व निसर्ग यांच्यातील सुसंवाद व आरोग्य कल्याणासाठी एक समग्र दृष्टिकोन दर्शवितो” अशा या सुंदर शब्दांनी या योग सत्राचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *