1 min read

गुलाबी बोंडअळी नियोजना साठी नॅटकोचे अत्याधुनिक तंत्रज्ञानवर चर्चासत्र

Loading

गुलाबी बोंडअळी नियोजना साठी नॅटकोचे अत्याधुनिक तंत्रज्ञानवर चर्चासत्र

दि.21जून, अमळनेर,
जळगाव जिल्हा हा कपाशीच्या उत्पादनासाठी तसेच आधुनिक शेतीसाठी ओळखला जातो. वर्षानुवर्ष येथे बागायती कपाशीची मोठ्या प्रमाणात पूर्व मोसमी लागवड केली जाते. मात्र गेल्या ५ ते ६ वर्षांमध्ये गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे उत्पादन लक्षणीय प्रमाणात घटले आहे. तसेच कपाशीचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना अडचणीचे झाले आहे.
या गुलाबी बोंड अळीच्या समस्येवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘नॅटको फार्मा लिमिटेड’ या कंपनीने “नॅटमेट पीबीडब्ल्यू” हे अत्याधुनिक उत्पादन बाजारात सादर केले आहे. या उत्पादनाचे अनावरण व मार्गदर्शन करण्यासाठी तसेच येणाऱ्या हंगामात कपाशीतील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी नॅटको द्वारे दिनांक 24 जून रोजी अमळनेर येथे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राचा लाभ तालुक्यातील 13 गावांतील 100 हून अधिक प्रगतशील शेतकऱ्यांनी घेतला. कंपनीमार्फत श्री. जी. राम मोहन( जनरल मॅनेजर ), व श्री.राकेश गोसावी ( एरिया बिजनेस मॅनेजर ) यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी नॅटको कंपनीचे अधिकृत विक्रेते सतगुरु अग्रो एजन्सी अमळनेर चे श्री. संजय काटे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. व नॅटमेट या नवीन तंत्रज्ञानाचा पूर्ण अभ्यास करून ते आत्मसात करण्याचे आवाहन केले. उपस्थित सर्व प्रगतशील शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानासाठी उत्तम प्रतिसाद दर्शवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *