1 min read

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.किशोरजी दराडे साहेब यांच्या प्रयत्नाने राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत  खास बैठकीचे आयोजन

Loading

नम्र आवाहन
🙏🙏🙏
सर्व पेंशन पीडित बंधू भगिनींना विनंती पूर्वक कळविण्यात येते की, उद्या शनिवार दिनांक 22/6/2024 रोजी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार मा.किशोरजी दराडे साहेब यांचे प्रयत्नाने राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदेसाहेब यांचे उपस्थितीत खास बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या ठिकाणी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन विषयावर महत्त्वपूर्ण निवेदन देऊन त्यांना आपल्याविषयी तात्काळ निर्णय घेण्यासाठी आग्रही भूमिका मांडावयाची आहे. आपण बहुसंख्येने उपस्थित राहिल्यास पुनश्च एकदा मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले जाईल. व हा निर्णय होण्यास नक्कीच मदत होईल .
त्यामुळे अहमदनगर त्याचप्रमाणे नाशिक धुळे, जळगाव, नंदुरबार व शक्य असेल त्या लगतच्या जिल्ह्यातील पेंशन पिडितांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. ही विनंती.
🙏🙏
बैठकीची वेळ व स्थळ

वार -शनिवार
दि. 22/6/2024
दुपारी ठीक 3.00वा
स्थळ. प्रवरा मेडिकल कॉलेज लोणी प्रवरा, ता.राहाता, जिल्हा अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *