1 min read

लोकमान्य विद्यालयात योग दिवस उत्साहात साजरा

Loading

लोकमान्य विद्यालयात योग दिवस उत्साहात साजरा

अमळनेर: आज २१ जून रोजी लोकमान्य विद्यालय व नवीन मराठी शाळा, अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस सामूहिकरीत्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व तसेच नियमित योगा केल्याने जीवनात होणारे फायदे याची माहीती देण्यात आली. यासाठी प्रमुख पाहुणे योगा गुरू प्रतिभाताई पाटील यांनी योगाचे विविध प्रकार व आसने करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी काही योगा प्रकार उत्साहात केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे यांचा पुष्पगुच्छ व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र मोरे व लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *