1 min read

पत्रकार अतुल जोशी यांचे निधन

Loading

पत्रकार अतुल जोशी यांचे निधन
.
जळगावातील मूळजी जेठा महाविद्यालयातील ‘ वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन ‘ विभागातील माजी विद्यार्थी आणि आमचे परममित्र अतुल जोशी ( वय ४६, रा.अमळनेर) यांचे २० रोजी सकाळी ९.३० वाजता नाशिकला किडनी विकारावर उपचार घेत असताना दवाखान्यात निधन झाले. त्यांनी ‘गावकरी ‘ मध्ये पत्रकारितेची सुरुवात केली. सध्या ते धुळ्यात ‘ लोकमत ‘ मध्ये वरिष्ठ उपसंपादक पदावर कार्यरत होते. ते विविध विषयांचे अभ्यासू पत्रकार, अत्यंत शांत, संयमी, नेहमी चेहऱ्यावर हास्य, अतिशय संवेदनशील मनाचे मित्र होते. ते वर्गातच नव्हे, तर सर्व महाविद्यालयात सर्वात उंच विद्यार्थी होते. सर्वांच्या मदतीला धावून जाणारा आमचा मित्र, आता आमच्यातून कायमचा निघून गेला आहे, हे मोठे दु:ख मनात घर करुन आहे. त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. ओम शांती….. ओम शांती…!🙏

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अमळनेर व

व्हाईस मिडीया यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *