1 min read

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसरसंस्थेत नविन शैक्षणिक वर्ष व शाळा प्रवेशोत्सव दिन साजरा

Loading

चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर
संस्थेत नविन शैक्षणिक वर्ष व शाळा प्रवेशोत्सव दिन साजरा

अमळनेर प्रतिनिधी
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे येथे आज डॉ.योगेश रघुनाथ महाजन सर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 15/6/2024 वार- मंगळवार रोजी नविन शैक्षणिक वर्ष व शाळा प्रवेशोत्सव दिन साजरा करण्यात आला.विशेष विद्यार्थ्यांना वाद्यांच्या गजरात वाजत गाजत स्वागत करून विशेष विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन शाळेत प्रवेश करण्यात आला.तसेच यावेळी उपस्थित पालक श्री. रोशन रामराव पाटील, civil Hospital Parola (Ambulance Driver) यांचे देखील स्वागत करण्यात आले.विशेष मुलांनी गृप डान्स,खेळ, संगीत खुर्ची, सहभाग घेतला व मनसोक्त आनंद लुटला.तसेच मुलांना शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ योगेश रघुनाथ महाजन सर यांचे वतीने शाळेचे मुख्याध्यापक मनिष किसन जाधव यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.व सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *