शिक्षक आमदारकीचा उमेदवारी अर्ज सादर करतांना नाशिक विभागातील शिक्षकांची मोठी गर्दी..
![]()
शिक्षक आमदारकीचा उमेदवारी अर्ज सादर करतांना नाशिक विभागातील शिक्षकांची मोठी गर्दी..
शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत
किशोर भिकाजी दराडे यांच्या नावाला शिक्षकांची पसंती..


नाशिक प्रतिनिधी
नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मी फक्त सोशल मीडियाद्वारे आवाहन केले आणि आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहून माझ्यावरील विश्वास अन प्रेम अधिक वृद्धीगत केले…त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!_
जळगाव,धुळे,नंदुरबार,नगर या जिल्ह्यासह नाशिकमधूनही आपण सर्व शिक्षक बांधव माझ्या कामावर विश्वास दाखवत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलात…! यानिमित्ताने नाशिक येथील संजीवनी लॉन्सच्या सभागृहात आयोजित शिक्षक मेळाव्यात उभे राहण्यासाठी जागा नव्हतीच पण आजूबाजूचे छोटे हॉल देखील खचाखच भरून गेले होते…!
आपले हे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे..!!
मी सहा वर्ष आपली प्रामाणिक सेवा केली..त्या सेवेची ही पावतीच मी समजतो किंबहुना या प्रेमाची उतराई आपले प्रश्न सोडवून मी केली व करत राहील..! त्यासाठी माझा अविरत संघर्ष सुरूच आहे आणि सुरूच राहील..!!
सर्व शिक्षक बंधू-भगिनींना मी शब्द देतो की,तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही…आपले प्रेम असेच वृद्धीगत करावेत आणि पुनश्च एकदा मला प्रथम पसंतीचे मत देऊन या मतदारसंघात आपले प्रश्न सोडविण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती.
◆ आपलाच सेवक ◆
किशोर भिकाजी दराडे
(शिक्षकांची पहिली पसंती)
✌️✌️✌️🙏🙏✌️✌️✌️

